ब्रेकिंग!17 फेब्रुवारीला काय होणार? माजी गृहमंत्र्यांची मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातील घोषणा…

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालीला वेग आला असतानाच आता राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील याचा पुनउच्चार करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येत्या 17 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 17 फेब्रुवारीला काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सध्याच्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चर्चा करणार असल्याचं म्हणाले आहेत.मंगळवारी मुंबईत ही बैठक होणार असल्याची माहिती त्यांनी मंचर येथील सभेत दिली. त्यामुळे आता 17 फेब्रुवारीच्या मुंबईच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच 17 फेब्रुवारीचा दिवस राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस ठरु शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक काळात वळसे पाटलांची तब्येत नाजूक असल्याने वळसे पाटील डॉक्टरांच्या सल्ल्याने मुंबईत होते. त्यामुळे मतदारसंघात वळसे पाटील फारच आजारी असल्याची चर्चा होती. मंचर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीनंतर आभार मेळाव्यात दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांच्या निधनाचा धक्का बसल्याचं कबूल केलं.

अजित दादांच्या निधनावर बोलताना ते म्हणाले, “मला काहीही झालेलं नाही. मी भक्कम आहे. फक्त अजितदादांच्या जाण्यामुळे मला भावना आवरत नाहीत,” त्यांची उणीव त्यांना जाणवली असे शब्द उच्चारत देखील वळसे पाटील भावुक झाले.