ब्रेकिंग! मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण उघडकीस अन् अजित पवार गटाचा मंत्री’ नॉट रिचेबल’,कारण काय?


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.एकीकडे विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना,मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाचे लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आले आहे. या सर्व प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे यांनी एका मेडिकल स्टोअरचा नियमित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी 35 हजार रुपयांची लाच घेतल्याच समजल्यानंतर लासलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. अटकेनंतर ढेरंगे याने खळबळजनक दावा केला की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवाच्या सूचनेनुसार घेतली होती. या सर्व प्रकरणात आता झिरवळ नॉट रीचेबल असल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे नाव चर्चेत आल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, कारवाई झाल्यापासून झिरवाळ हे ‘नॉट रिचेबल’ असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्यासाठी शरद पवार गटाकडून हालचाली केल्या जात आहेत. तर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांकडून विलीनीकरणाला विरोध होत आहे. त्यात आता अजित पवार गटाचा मंत्री नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!