दौंड येथे गरीबरथ एक्सप्रेस मध्ये दोन प्रवाशांना लुटले, ७ लाखांचा ऐवज लंपास, गुन्हा दाखल..


दौंड : दौंड हद्दीत रेल्वे जंक्शन येथे गरीब रथ एक्सप्रेस मध्ये झालेल्या दोन प्रवाशांचा ऐवज लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ७ लाख रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याने एकच खळबळ उडाली.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध दौंड लोहमार्ग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर – पुणे गरीब रथ एक्सप्रेस मध्ये शनिवारी ( ता. १४ ) या चोरी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नागपूर – पुणे गरीब रथ एक्सप्रेस मध्ये शनिवारी ( ता. १४ ) या चोरी झाल्याची घटना घडली आहे. जया पंकज जाजू ( वय ५५ , रा. औंध) या धामणगाव ते पुणे असा प्रवास करीत होत्या. प्रवासाच्या दरम्यान दौंड कॉर्ड लाइन स्टेशन सोडल्यानंतर त्यांच्या आसना जवळील पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले.

पर्स मधील कानाचे टॉप्स, हिऱ्याचे ब्रेसलेट, मंगळसूत्र, दोन डायमंडच्या अंगठ्या, ३ सोन्याच्या अंगठ्या व रोख पाच हजार रूपये, असा एकूण ६ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

तसेच याच गरीब रथ एक्सप्रेस मधील दुसरे प्रवासी सचिन रमेश नगरकर ( वय ४३, रा. लोहगाव, पुणे ) यांच्या बॅग मधील ७१ हजार ५०० रूपयांची रोकड आणि कागदपत्रे चोरीस गेली आहे. या चोरीबाबत जया जाजू यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!