मुलुंड अपघातप्रकरणी मोठी अपडेट!पाच अधिकाऱ्यांना अटक अन् कंपनीवर गुन्हा दाखल


मुंबई : मुंबईतील मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंट स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना काल (ता. 14)घडली होती.या अपघात प्रकरणात आता कारवाईला जोर आला असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच मिलन रोड बिल्डटेक या रिलायन्स अस्तालदी कंपनीच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलुंड येथे बांधकामाधीन मेट्रो पिलरचा भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. तसंच तीन वाहने स्लॅबखाली दबली गेली आहेत.. रामधन यादव असं मृत व्यक्तीचं नाव असून ते उत्तर प्रदेशचा रहिवासी होते. मुंबई फिरण्यासाठी आले असता त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातानंतर आता कारवाईला वेग आला असून पाच अधिकाऱ्यांना अटक करून कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ, डेप्ट्युटी मॅनेजर सौरभ सिंह, सुपरवायर प्रशांत भोईर आणि अवधूत इनामदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान अवधुत इनामदार हे डीबी हिल एलबीजी कंपनीशी सबंधित असल्याची माहिती आहे. मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजीत साळवे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. मेट्रो ब्रीज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देश एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. त्यामुळे या अपघात प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!