मनोरंजन विश्वात खळबळ!’ या ‘अभिनेत्रीला गँगस्टरकडून तब्बल 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी


पुणे : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री हिमांशी खुराना हिला एका गँगस्टरकडून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून पोलिसांकडून त्याचा तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिला आपल्या अधिकृत ई-मेल आयडीवर खंडणीची मागणी करणारा ई-मेल आला होता. या ई-मेलमुळे तिने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ तक्रारीवर कारवाई करत सोहाना पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 308(4) (खंडणी) आणि 351(3) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

याबाबत पोलिस अधीक्षक (तपास) सौरव जिदांल यांनी सांगितले की, तक्रारीनुसार संबंधित ई-मेलमध्ये परदेशात असलेल्या गँगस्टरने पाठविल्याचा दावा असलेला व्हॉइस नोट होता, ज्यामध्ये 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे.सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून ई-मेल आणि व्हॉइस मेसेजचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हिमांशी खुराना ही अभिनेत्री आणि मॉडेल असून ती 2013 मधील पंजाबी चित्रपट Sadda Haq मधील भूमिकेमुळे ओळखली जाते. तिने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे तसेच ती Bigg Boss च्या तेराव्या पर्वातही सहभागी झाली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!