शेतकऱ्यांची कर्जाच्या विळख्यातून सुटका! ‘या’ तारखेपर्यंत कर्जमाफी होणार, थेट 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ..

पुणे : दीर्घ काळापासून कर्जमाफीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल,अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच शेतकरी कर्जमाफीसाठी 30 जून ही अंतिम मुदत जाहीर केली होती. कृषिमंत्री भरणे यांनी शनिवारी या घोषणेचा पुनरुच्चार करत सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.त्यामुळे लवकरच कर्जमाफी होणार आहे.
या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून लवकरच मुक्त होणार आहे.
राज्यातील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा थेट लाभ होणार असून शेतकरी कर्जमाफीच्या विळख्यातून सुटणार आहेत.गेल्या काही वर्षांत राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ आणि गारपिटीसारख्या आस्मानी संकटांना सामोरे जात आहेत. त्यातच बाजारभावातील तीव्र चढउतार, उत्पादन खर्चात वाढ आणि अपेक्षित दर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

परिणामी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेली पीककर्जे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर थकली आहेत. आता सरकार 30 जून पूर्वी कर्जमाफी देणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.