लाडक्या बहिणीसाठी शेवटची संधी!फक्त याच बहिणींना eKYC करता येणार, पाहा नवा बदल…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी सरकारकडून मोठा बदल करण्यात आला आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक किंवा नजरचुकीने माहिती भरण्यास चूक केली होती. त्यांना आता शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र ही eKYC ची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून eKYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. असा मेसेज पोर्टलवर दिसत आहे.त्यामुळे त्यांनाच फक्त दुरूस्ती करता येणार आहे

सरकारने ई केवायसी मध्ये चूक झालेल्या लाभार्थ्यांनाच दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे आता गेल्या महिन्यापासून रखडलेले हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने.eKYC प्रक्रिया सुरू केली आहे. पण ही सर्वांसाठी नाही. तर फक्त ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ज्या महिलांनी आधी अर्ज भरलेला आहे अन् त्यात चूक झालेली आहे. त्या महिलांना चूक दुरूस्त करण्याची संधी राज्या सरकारने दिली आहे.
ज्या महिलांनी योजनेचा फॉर्म भरताना eKYC प्रक्रियेत चुकीचे पर्याय निवडले होते, अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने पोर्टलवर दुरुस्तीची विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर 2025पर्यंत ज्या महिलांना ईकेवायसी करता आलेली नाही, त्यांना यापुढे 1500 रूपयांचा लाभ मिळणार नाही.

दरम्यान ईकेवायसी करताना ज्या महिलांकडून चूक झाली आहे, त्या महिलांना दुरूस्तीची संधी राज्य सरकारने दिली आहे. त्याच महिलांनी पोर्टलवर जाऊन दुरूस्ती करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.