‘हर हर महादेव’! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाशिवरात्रीचा उत्साह, शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी


पुणे: आज महाशिवरात्री. महाशिवरात्रीनिमित्त ‘ओम नमः शिवाय, हर हर महादेव’ असा जयघोष करत भाविकांनी राज्यभरातील विविध शिवमंदिरात मोठी गर्दी केली आहे. महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांसह सर्व शिवमंदिरांत भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी आहे.

राज्यातील पाच महत्त्वाच्या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.तसेच
परळी येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक महापूजा करण्यात आली आहे.त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक आले आहेत.अंबरनाथच्या मंदिरात दर्शनासाठी बनारसवरूनही भाविक दाखल झाले आहेत.

दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर नगरीत विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे.तसेच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात सध्या विकास आराखड्याअंतर्गत मंदिराच्या दुरुस्तीची आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असले तरी परंपरेनुसार शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.
भीमाशंकर मंदिर बंद असल्याने पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी स्थानिक मंदिरांत गर्दी केली आहे.

तसेच बीडमधील सरोवराच्या मध्यभागी असलेल्या १२ व्या शतकातील प्राचीन हेमाडपंती कनकालेश्वर मंदिरात पहाटे महापूजा पार पडली आहे.पुण्यातील मुठा नदीकाठी असलेल्या ऐतिहासिक ओंकारेश्वर मंदिरात शंखनाद आणि फुलांच्या सजावटीने भक्तांचे स्वागत होत आहे.आज महाशिवरात्र निमित्त पूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!