शरद पवारांची प्रकृती कशी? लेक सुप्रिया सुळेनीं दिली महत्त्वाची अपडेट!


पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयातून सहा दिवसानंतर आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आता त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे महत्त्वाची माहिती दिली आहे.साहेबांना आज डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला असून, त्यांची प्रकृती आता उत्तम असल्याची माहिती सुळे यांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “पवार साहेबांच्या तब्येतीत आता पूर्णपणे सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील तीन ते चार दिवस घरीच राहून पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. या विश्रांतीनंतर ते पुन्हा आपल्या दैनंदिन कामाला आणि सार्वजनिक उपक्रमांना सुरुवात करतील, त्यांच्या प्रकृतीबाबतच ट्विट सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियवर केल आहे

दरम्यान शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या काळजीपोटी त्यांच्यावर प्रेम करणारे राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. या कठीण काळात मिळालेल्या प्रेमाबद्दल सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

तसेच पवार साहेबांवर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व सपोर्टिंग स्टाफ यांनी घेतलेल्या काळजीबद्दल सुप्रिया सुळे यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांच्या तत्पर सेवेमुळे साहेबांच्या प्रकृतीत जलद सुधारणा झाल्याचे लेक सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!