मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती ठणठणीत, आजच डिस्चार्ज; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट.


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये प्रकृती बिघडल्याने दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर पूरवेझ ग्रॅट यांनी ही माहिती दिली आहे.

रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना आज डिचार्ज देण्यात येणार आहे, त्यांची प्रकृती चांगली आहे आणि ते बरे झाले आहेत. त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यानंतर ती हळूहळू त्यांची दैनंदिन काम आणि सार्वजनिक कार्यक्रम पुन्हा सुरू करू शकतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद निवडणुक निकालाच्या दिवशी शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होत. त्यानंतर त्यांच्या काही प्राथमिक चाचण्या देखील करण्यात आल्या.खोकला आणि श्वासाच्या त्रासामुळे आणि ताप आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे.

दरम्यान शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या, सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!