सस्पेन्स संपला!भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर, कोणाला संधी?

पुणे: पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकाकडून प्रयत्न सुरू होते.आता भाजपकडून आगामी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अनेक नवनिर्वाचित नगरसेवकांची सदस्यपदी वर्णी लागली आहे.

भाजपकडून पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यासाठी 12 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.यामध्ये रूपाली धाडवे,कालिंदा पुंडे,जयश्री भुमकर,विशाल कानवडे,सातव रत्नमाला,प्राची आल्हाट,मयुरी कोकाटे,मानवतकर निशा,श्रीनाथ भिमाले,दादा कोद्रे,वृषाली कामठे,संदीप बेलदरे यांच्या नावाचा समावेश आहे.
पुणे महापालिकेत पहिली सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत भाजपकडून स्थायी समितीच्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता महापालिकेत पुढील आठवड्यात पीठासन अधिकारीच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान भाजपचे नगरसेवक आणि स्थायीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे श्रीनाथ भिमाले यांनी याविषयी महत्वाची माहिती दिली. तसेच भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या बाबतीत सुद्धा लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.