हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अखेर होणार पूर्ण, आज म्हाडाच्या ‘एवढ्या’ घरांची सोडत; पुण्यासह ‘या’ तीन जिल्ह्यांना होणार फायदा..


पुणे : पुणेकरांचे आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होणार असून पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील चार हजार १८६ सदनिकांची सोडत आज, मंगळवारी होणार आहे.

आचारसंहितेत अडकलेली ही सोडत अखेर आज होणार आहे. म्हाडातर्फे चार हजार १८६ सदनिकांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेमुळे ही सोडत जाहीर करण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्याबाबत ‘म्हाडा’ने सरकार आणि निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. अखेर या सोडतीला मुहूर्त मिळाला आहे.

‘म्हाडा’चे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात ही सोडत आज सकाळी १२ वाजता होणार आहे. त्या वेळी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार आहेत.

एकूण चार हजार १८६ सदनिकांपैकी पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणांतर्गत २० टक्के, सर्वसमावेशक योजनेतील ३३२२ सदनिकांचा आणि १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ सदनिकांचा सोडतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सोडतीच्या ठिकाणी सर्व अर्जदारांनी उपस्थित राहावे. ज्यांना उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनी ‘यूट्यूब’वरून या कार्यक्रमाची सोडत पाहण्याचे आवाहन मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!