ब्रेकिंग! अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता उद्धव ठाकरे मैदानात, थेट प्रस्तावच दिला…


 

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. असे असताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यामध्ये एक मोठी घडामोड समोर आली आहे.

आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद देण्याची तयारी दाखविली आहे.

तसा प्रस्तावच त्यांनी दिल्याची माहिती खात्रीशीर माहिती समोर येत आहे. आघाडीमध्ये कोणाला कितीही जागा आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल अशी ग्वाही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना या प्रस्तावात दिली आहे.

सिल्वर ओकवर ठाकरे-पवार भेट झाली, त्यावेळी याबाबत बोलणी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अद्याप संधी येऊन देखील राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नसल्याची खंत नुकतीच अजित पवारांनी व्यक्त केली होती. पण आता संधी मिळाल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!