थेऊरमध्ये राष्ट्रवादीचा डंका!! जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीनही उमेदवारांचा मोठा विजय…


उरुळी कांचन : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारी, शनिवारी, मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 हजार 438 उमेदवार रिंगणात होते. एकूण 25 हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले.

तसेच जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता.9) जाहीर होताच थेऊर (ता. हवेली) परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

दरम्यान, थेऊर जिल्हा परिषद गटातून कोमल संदेश आव्हाळे, आव्हाळवाडी पंचायत समिती गणातून सुषमा संतोष मुरकुटे आणि थेऊर पंचायत समिती गणातून युवराज हिरामण काकडे यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांचा सपशेल पराभव केला. तीनही उमेदवारांनी प्रचंड मताधिक्याने बाजी मारत जनतेचा विश्वास पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर कायम असल्याचे दाखवून दिले.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत राष्ट्रवादीची आघाडी वाढत गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला, तर निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष करण्यात आला.दरम्यान, या निकालामुळे स्थानिक राजकारणात राष्ट्रवादीची ताकद अधिक मजबूत झाली असून विरोधकांना मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!