सस्पेन्स संपला! मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू रावडे यांची वर्णी तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी.

मुंबई : बहुचर्चित मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीकडे सर्व राज्याचे लक्ष लागल असताना या महापालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपकडून रितू तावडे महापौर तर शिंदे गटाकडून संजय घाडी उपमहापौर पदासाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा यांनी संयुक्त निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या युतीला बहुमत मिळाले त्यामुळे त्यांनी महापौर पदासाठी दावा केला. आता भाजपकडून महापौरबदासाठी रितू तावडेंचं नाव निश्चित करण्यात आले. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
या मुंबई महापालिकेत 227 जागांपैकी भाजपने 89,ठाकरेंची शिवसेना 65, शिंदेंची शिवसेना 28, काँग्रेस 24, मनसे 6,अजित पवारांची राष्ट्रवादी 3, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, एमआयएम आणि इतर 10 जागांवर निवडून आले आहेत. भाजप 89 जागांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर ठाकरे यांची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 114 जागांची आवश्यकता असते. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने हा आकडा पार केला आहे.

मार्च 2022 पासून मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांमुळे ती संपुष्टात येईल. लवकरच या नव्या महापौरांचा शपथविधी पार पडेल.