ब्रेकिंग! अजित पवारांच्या निकटवर्तीयाची तब्बल 4 तास सीआयडी चौकशी; कोणत्या प्रश्नांची विचारपूस?

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध महत्त्वाचे खुलासे होत असताना हा घात की अपघात असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. अशातच आता अजित पवारांचे निकटवर्तीय त्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सीआयडीने आज या प्रकरणासंदर्भात चौकशी केली. तब्बल चार तास ही चौकशी करण्यात आली.

समोर आलेल्या माहितीनुसार,सीआयडी अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या खाजगी सचिवांकडून 28 जानेवारी रोजी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत चौकशी करण्यात आली. 27 जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का, याबाबत देखील अविनाश सोलवट यांची चौकशी केली. अजित पवारांच्या प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले होते याबाबत सुद्धा विचारपूस करण्यात आली.
अजित पवारांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांची तब्बल चार तास चौकशी मंत्रालयात करण्यात आली. अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, 27 जानेवारी रात्रीच्या चर्चा आणि इतर संबंधित माहितीविषयी प्रश्न विचारले गेले

. या प्रश्नांच्या उत्तरांमधून अपघाताच्या कारणांसाठी तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर तपशील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या का याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताचा तपास हा त्रिस्तरीय होणार आहे. यातून अनेक रहस्य उघडली जाणार आहेत.
अजितदादांच्या विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे. तर अपघाताचा प्राथमिक अहवाल तिसऱ्या टप्प्यामध्ये सादर केला जाणार आहे. यामधून काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.