पुणे महापालिका प्रशासनाचा धक्कादायक निर्णय! अजित पवारांच्या शोककाळात अधिकाऱ्यांकडून नाच -गाण्याच्या कार्यक्रमाच आयोजन


पुणे : महाराष्ट्राचे दिलदार व्यक्तिमत्व आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांसह अख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाला अद्याप दहा दिवस पूर्ण झाले नसतानाही पुणे महापालिकेच्या प्रशासनाने घेतलेल्या धक्कादायक निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.

येत्या पंधरा तारखेला पुणे महापालिकेचा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन पुणे महापालिका प्रशासनाने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान अजित पवार यांचे विमानअपघातात निधन झाल्याने सर्वस्तरात दुखाची लाट उसळली आहे. लाखो चाहते,समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांच्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाला अद्याप दहा दिवस पूर्ण झाली नसताना पुणे महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान अजित पवार यांच्या पक्षाने पुण्यात मोठी विकासकामे केली. मात्र, अजित पवार यांच्या निधनाचा पुणे महापालिका प्रशासनाला विसर पडल्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!