अजित पवारांसोबत बडा नेता जाणार होता बारामतीला, शेवटच्या क्षणी…; या नेत्याचा खळबळजनक दावा

पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबीयांसह अख्या महाराष्ट्राला धक्का बसला.यादरम्यान राज्यातील बडा नेता त्यांच्यासोबत प्रवास करणार होता पण ऐनवेळी त्यांनी विमान प्रवास टाळला, त्यामुळे त्यांचा जीव वाचला असा दावा केला आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. ज्यादिवशी भीषण अपघात झाला, त्यादिवशी मी देखील त्यांच्यासोबत विमानातून जाणार होतो.त्यादिवशी अजित पवार यांनी मला बारामतीमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. मी आणि अजित पवार एकाच विमानातून जाणार होतो.पण मला पोहोचायला उशीर झाला.
दरम्यान अजित पवार यांचे विमान ठरलेल्या वेळेत निघून गेले. मला पोहोचण्यासाठी उशीरा झाला आणि मी बारामतीला जाणे रद्द केले. मला विमानतळावर जाण्यास उशीर झाल्याने माझा जीव वाचला असला तरीही राज्याने एक मोठा नेता नक्कीच गमावले असल्याचं दुःख जानकर यांनी व्यक्त केलं.

दरम्यान अजित पवार यांच्या पार्थिवावर 29 जानेवारीला शासकीय इतमामाम अंत्यविधी करण्यात आले. विद्या प्रतिष्ठांणच्या प्रागंणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.