ब्रेकिंग! अजित पवारांच्या विमान अपघाताची तीन स्तरावर विशेष चौकशी होणार; सगळं गुढ उकलणार?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच आता या प्रकरणाची तीन स्तरावर विशेष चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीतून अपघाताचा सगळं गुढ समोर येणार आहे.

पहिल्या तपासामध्ये विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन केलं जाणार आहे.

दुसऱ्या तपासामध्ये विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार आहे.यामधून विमान जमिनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे.

तिसऱ्या तपासात अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाणार, अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हा तपास आणि अहवाल प्रक्रिया दिर्घकाळ चालणार हे स्पष्टच आहे.

दरम्यान या विमानअपघाताच्या विशेष तीन स्तरीय चौकशीनंतर तपासाअंती नागरी विमान महासंचनालयाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. यातून काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!