अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल मोठी माहिती आली समोर, नक्की चूक कुठे ते…


बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, नऊ दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी शंका देखील उपस्थित केली. या विमान अपघाताचे व्हिडीओही पुढे आली. थेट विमान एका बाजूला अचानक कोलमडल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या विमान अपघाताची चाैकशी देखील सुरू आहे.

अजित पवार यांचा विमान अपघात नक्की कसा झाला, याबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. विमान धावपट्टीजवळ पोहोचले होते, त्यावेळी धुके असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय जेव्हा पायलट विमान उतरवण्याकरिता प्रयत्न करत होता, त्यावेळी ॲगल चुकला असल्याचाही अंदाज आहे.

कारण धावपट्टीच्या अगदी शेजारी असलेल्या शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्सची ताब्यात घेतला. कॉकपिय व्हॉईस रेकॉर्डचा डेटा अगदी बारकाईने तपासला जात आहे.

त्यामुळे स्पष्ट होईल की नक्की विमान अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी काय झाले. कारण शेवटच्या क्षणी पायलटमध्ये काय संवाद झाला हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होते.

विमान उतरवताना पायलटचा धावपट्टीचा अंदाज चुकल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. हैराण करणारे म्हणजे विमान अपघाताच्या काही मिनिटे अगोदरच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला होता. ज्याचे रेकॉर्डिंगही पुढे आले. या फोन संवादानंतर अगदी काही मिनिटांमध्ये भीषण विमान अपघात झाला. नेमके काय घडले हे देखील यादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!