पार्थ पवारांना मुंढवा प्रकरणात क्लीन चिट नाहीच,बाहेर काढलं तर त्यांच्याविरोधात मी लढा…,’; अंजली दमानिया संतापल्या


पुणे : पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळाप्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना क्लीनचीट मिळाली असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे वृत्त फेटाळत पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती दिली आहे.

अंजली दमानिया यांनी असे म्हटले आहे की,कोणत्याही परिस्थितीत मुंढवा भूखंड घोटाळाप्रकरणी पार्थ पवार बाहेर येऊच शकत नाहीत आणि जरी समितीनं अहवालात बदल तेले तरी उच्च न्यायालयात जाऊन आपण न्यायालयात लढत त्याविरोधातील लढा सुरूच ठेवणार असल्याचं दमानियांनी सांगितलं.

याप्रकरणी पोलीसांनी दाखल केलेल्या बावधन आणि खडकच्या एफआयआरमध्ये जी चार्जशीट झाली होती, त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव पहिल्या दिवशीपासून नाही म्हणून आमचा लढा होता. एफआयआरमध्ये नाव नाही, तर चार्जशीटमध्ये नाव येण्याचा प्रश्नच नाही. पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चीट मिळालेली नाही,असं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणात सहभागी असलेल्या शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यामध्ये झालेल्या पॉवर ऑफ अॅटर्नीचे कागदपत्र दाखवत प्रत्येक पानावर पार्थ पवारांचं नाव, फोटो, शिक्का आणि त्यांची सही असल्याचं दमानियांनी ठणकावून सांगितल आहे.शिवाय या पुराव्यांवर साक्षीदाराची सहीसुद्धा आहे आणि हा साक्षीदार पार्थ पवारांसोबत इतर कंपन्यांमध्ये संचालक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मुंढवा प्रकरणातील नेमलेल्या खरगे समितीला काही पुरावी दिल्याचा उलगडा करत अंजली दमानिया यांनी पार्थ पवारांना यातून बाहेर काढता येणारच नाही आणि काढलं तर मी समितीला धारेवर धरून न्यायालयात याविरोधात लढा देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!