पुणे विद्यापीठात मोठा राडा! अश्लील रॅप साँगचे शूटींग केल्याप्रकरणी विद्यापीठात तोडफोड


 

 

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एका अश्लील रॅप साँगचे शूटींग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. विद्यापीठातील मुख्य इमारतीतच हे अश्लील रॅप साँग शूट केल्यामुळे या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक पावित्रा घेतला असून विद्यापीठात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली असून बैठकही उधळून लावली आहे. तसेच यावेळी आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

वरिष्ठ पदाधिकार्यांची सुरु असलेली बैठकही यावेळी अभाविपनं उधळून लावली. यावेळी रॅप साँग प्रकरणी प्रशासनावर अनेक सवालही करण्यात आले. तसेच काही विद्यापीठाच्या काही वस्तूंची तोडफोड करण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, शुभम जाधव नावाच्या मुलाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप साँग शूट केले होते. या रॅप साँगसाठी विद्यापीठातील काही कर्मचाऱ्यांनीच तोंडी परवानगी दिल्याची माहिती त्याने दिली होती.

यानंतर राजकीयसह समाजाच्या सर्वच क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता अभाविपनं या रॅप शूट प्रकरणी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले आहे. यामुळे वातावरण तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!