अजित दादांचा अपघात झाला ते विमान पाहून रोहित पवार हळहळले; म्हणाले, आमचा रिअल हिरो….

बारामती : मुंबईहून बारामतीला अजित पवार निघाले असता बारामती विमानतळाच्या शेजारी त्यांच्या विमानाची मोठा अपघात झाला. सुरूवाला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी झाले. मात्र, त्यानंतर थेट अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी आली. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

या घटनेला पाच दिवस झाले तरी अद्यापही या घटनेवर विश्वास ठेवणं कठीण होत आहे. या घटनेने पवार कुटुंबीयही हेलावून गेलं आहे. तर, संपूर्ण राज्यालाही मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, सध्या या अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता या घटनेचा तपास सीआयडी करणार आहे
या घटनेच्या तपासासाठी अपघातग्रस्त विमानाचाही तपास होणार आहे. त्यासाठी आज बारामती येथून हलवण्यात आलं. यायाच व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला. यावेळी त्यांनी अत्यंत भावुक मेसेजही या व्हिडिओसोबत शेअर केला.

मनावरून कधीच न पुसणाऱ्या कटू स्मृतीचं प्रतिक बनलेलं हे धूड बारामतीतून चौकशीकामी हलवलं. ज्याने काळ बनून आमच्या #रिअल_हिरो ला आमच्यातून हिरावून नेलं आणि महाराष्ट्राच्या असंख्य स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली…! याची पुढच्या काळात चौकशी होईलही आणि आम्हीही त्यासाठी पाठपुरावा करु पण आमचा रिअल हिरो परत येणार आहे का?, अशी भावुक पोस्ट रोहित पवार यांनी आज त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन केली.
