अजित दादांच्या निधनानंतर अदानी शरद पवारांच्या घरी, राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण, ४५ मिनिटं चर्चा….


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उद्योगपती गौतम अदानी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. सिल्व्हर ओक येथील पवारांच्या घराती दोघांमध्ये जवळपास ४५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली.

अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ही सांत्वनपर भेट असल्याचे मानले जाते. परंतु या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य राजकीय विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. गौतम अदानी यांनी रविवारी सायंकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट दिली.

या भेटीत दोघांमध्ये ४५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी ही भेट असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

कारण सुनेत्रा पवार यांनी अजित दादा यांचा वारसा चालवण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, गौतम अदानी आणि पवार कुटुंब यांच्यात जवळचे संबंध आहेत. अदानी यांनी नुकतीच बारामती येथे एआय सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यासाठी भेट दिली होती. त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनी कुटुंबीयांसह एकत्र अदानी यांचे स्वागत केले होते.

त्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. आता झालेल्या भेटीमुळे या चर्चांना आणखी तीव्र गती मिळाली आहे. विशेषतः अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच सुनेत्रा पवार यांनी राज्य मंत्रिमंडळात प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!