अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा ; आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी नवीन योजना सुरु केली आहे. महिलांसाठी SHE Mart योजना सुरु केली आहे.या योजनेत महिलांना खूप फायदा होणार आहे.

काय आहे SHE Mart योजना?
केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या SHE Mart या योजनेचा उद्देश महिलांना व्यवसाय करण्यासाठी मदत व्हावी,हा आहे. या योजनेत लघु आणि मध्यम उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज मिळते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्याची आणि त्यात वाढ करण्याची संधी मिळणार आहे.

यापूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात होते.तसेच अर्थसंकल्पात अजून एक घोषणा करण्यात आली आहे. लखपती दीदी योजना सुरु केली होती. या योजनेचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेत महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यानंतर आती ही नवीन SHE Mart योजना सुरु केली आहे. या योजनेत व्यवसाय स्थिर करण्यासाठी मदत मिळेल. याचसोबत कमी व्याजदराने कर्जदेखील मिळणार आहे.
दरम्यान महिलांचा आर्थिक सहभाग वाढला तर कुटुंबाचेच उत्पन्न वाढणार आहे. त्याचसोबत अर्थव्यवस्थादेखील मजबूत होणार आहे. ही योजना बचत गट किंवा स्टार्टअप चालवणाऱ्या महिलांसाठी उपयोगी ठरणार आहे