केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून ते युवकांसाठी मोठ्या घोषणा, काय स्वस्त.. काय महाग, जाणून घ्या संपूर्ण माहिती..

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांपासून ते युवकापर्यंत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारच्या 2026 -27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालं हे जाणून घेऊया.

अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा?
१. हे युवाशक्तीचे बजेट आहे, ज्यात शेतकरी, गरीब आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे.

२. महसूल तूट कमी करण्यावर सरकारची भर राहिली आहे.
३. उत्पादकता वाढवणे, जागतिक अनिश्चिततेचा सामना करणे, सर्वांचा विकास आणि सर्वांना सोबत घेणे यावर काम करणे.
४. पायाभूत सुविधा वाढवणे आणि एकत्रित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. रोजगार निर्मिती आणि व्यापार सुधारणांवर भर.
५. सार्वजनिक गुंतवणुकीवर सरकारन लक्ष केंद्रित केल आहे. आर्थिक वाढ तीन प्रमुख उद्दिष्टांवर केंद्रित आहे.
६. EMS PLI योजनेची तरतूद 40 हजार कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव.
७. तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात रेअर अर्थ मिनरलसाठी कॉरिडॉर तयार केले जातील.
८. एमएसएमई ग्रोथ फंडसाठी ₹10,000कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
९. सीतारमण म्हणाल्या, आम्ही ISM 2.0ची सुरुवात करत आहोत. यामुळे सेमीकंडक्टर उत्पादन वाढेल.
१०. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी 40,000कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
या अर्थसंकल्पातून भारताच्या आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळेल असा विश्वास वर्तवला जात आहे.
2026- 27 चा अर्थसंकल्पातून काय स्वस्त, काय महाग झालं?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सामान्यांना दिलासा देखील मिळाला आहे. या अर्थसंकल्पातून कॅन्सरची औषधं, मधुमेहाचे औषध,क्रीडा साहित्य, मोबाईल फोन, इव्ही बॅटरी,सौर पॅनल, वैद्यकीय उपकरणे, एलसीडी एलईडी,भारतात बनवलेले कपडे, इव्ही वाहने, मोटरसायकल,फ्रोझन मासे,वैद्यकीय उपकरणे,टीव्ही, लिथियम बॅटरी, लिथियम आयन बॅटरी, अपघात विमा स्वस्त झाला आहे.
तसेच या अर्थसंकल्पातून इंटर ऍक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले, बूट खनिज,दारू, पीव्हीसी फ्लेक्स सीट्स महाग झाल्या आहेत.