ब्रेकिंग!अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाबाबत धक्कादायक माहिती,VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान ब्लॅकलिस्टेड…

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.अजित पवार ज्या विमानात बसले होते ते VSR व्हेंचर्स कंपनीचे विमान आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्लॅकलिस्टेड असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत युरोपियन सुरक्षा यंत्रणेने गंभीर खुलासे केले आहेत. यात विमान कंपनीचे काळे कारनामे उघड झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मुंबईहून बारामतीला गेले होते. पण लँडिंग करत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं. या अपघातानंतर अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. आता या अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात असतानाच विमानाचे काळे कारणामे उघड झाले आहेत.युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीने VSR व्हेंचर्स या कंपनीला लेव्हल १ ची नोटीस दिली होती.
याचा अर्थ असा की, कंपनीच्या विमानांमध्ये प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी गंभीर तांत्रिक त्रुटी होती. सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत झालेल्या एका अपघातानंतर कंपनीने आवश्यक कागदपत्रे आणि सुरक्षा रेकॉर्ड देण्यास नकार दिला होता. ज्यामुळे त्यांचे परवाने वर्षभरापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.ती कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आधीच ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान युरोपियन युनियनच्या सुरक्षा यंत्रणेने या कंपनीच्या सुरक्षिततेवर गंभीर ताशेरे ओढले होते. तरीही ही कंपनी सेवा कशी पुरवत होती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी असूनही ही कंपनी उड्डाणे कशी करत होती? हे यंत्रणेचे मोठे अपयश मानले जात आहे. मूळ पायलट वाहतूक कोंडीत अडकल्याने १५ हजार तासांचा अनुभव असलेल्या कॅप्टन सुमित कपूर यांना ऐनवेळी बोलावण्यात आले होते. त्यांना उड्डाणाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता का? असा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे.महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.. यातील माहितीवरून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल. कंपनीच्या मालकांवर कडक कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
