केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण सलग नवव्यांदा सादर करणार अर्थसंकल्प; आज कोणत्या घोषणा होणार?


पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत.त्या सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे.याअर्थसंकल्पातून सामान्यांना,शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिल आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसद भवनात पोहोचल्या आहेत. त्यांच्या या अर्थसंकल्पाला राष्ट्रपतींनी मान्यता दिली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कररचनेत कोणतं गिफ्ट मिळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!