मुंबई हादरली ; रात्रीच्या भर अंधारात कारमध्ये 14 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, आधी भांगेच्या गोळ्या आणि नंतर…;


मुंबई : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच मुंबईत रात्रीच्या भर अंधारात रस्त्यावर चारचाकीत अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधमानीं तरुणीला भांगेच्या गोळ्या आणि मद्य पाजून बेशुद्ध करत हे कृत्य केले.या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मीरा -भाईदर रोड परिसरात पीडित तरुणीला 21 वर्षीय सलमान खान या मित्राने चारचाकी वाहनात बसवून तिला कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले. पेढे तरुणीला जबरदस्तीने भांगेच्या गोळ्या आणि मद्य देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यावेळी सलमान खान यांच्यासोबत त्याचा 24 वर्षीय मित्र सरदारजी देखील उपस्थित होता. त्यानंतर वाहनातच अमानुष अत्याचार सुरू झाला. दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर चारचाकीतच अत्याचार केला.

या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने घडलेला सारा प्रकार आपल्या कुटुंबीयांना दुसऱ्या दिवशी सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून मिरा रोड पोलिस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत बाललैंगिक अत्याचारासह गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर त्यांनी शोध घेत, आज दोन्ही आरोपींना अटक केली.

दरम्यान भर रस्त्यावर घडलेला हा प्रकार शहरातील महिलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसंच खरंच महिला आणि मुली शहरात सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!