साईबाबांना भरभरून दान, पण साई संस्थानची डोकेदुखी वाढली, काय आहे कारण जाणून घ्या.


 

 

शिर्डी : शिर्डी देवस्थानला रोज अनेकजण भेट देत असतात. यामुळे संस्थानची तिजोरी नेहमी भरभरून वाहत असते. देशातील प्रमुख श्रीमंत देवस्थानांमध्ये या देवस्थानाचीही वर्णी लागते.

असे असताना मात्र भक्तांनी केलेल्या एका दानामुळे सध्या संस्थानची डोकेदुखी वाढली आहे. अनेक भाविक दानपेटीत 1, 2, 5 , 10  रुपयांची नाणी टाकतात. या नाण्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली. आता बँकाही त्या स्वीकारायला तयार नाहीत.

वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांचे सुट्टे नाणे प्राप्त होतात. आणि हे नाणे स्विकारण्यास बँका असमर्थता दर्शवत आहेत. दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिर्डी शहरा व्यतिरिक्त जिल्हयातील तसेच परजिल्हयातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडण्याचे संस्थानच्या विचाराधीन आहे. तर संस्थान यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!