वातावरण तापलं! भाजपकडून मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवल्याने वादंग, उमेदवारावर गंभीर आरोप


पुणे: राज्यात महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही दिवशी शिल्लक असताना भाजपने कुळगाव बदलापूर नगरपालिकेत मुस्लिम उमेदवार नगरसेवकासाठी पुढे केल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे. या निवडीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वातावरण तापलं आहे.

भाजपाने मुस्लिम समाजातील शागोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शागोफ गोरे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत मनसेचे राम जगताप यांनी त्यांच्यावर हिंदू–मुस्लिम दंगलीतील गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला आहे. मात्र याबद्दल सध्या कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नसल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपने तुषार आपटे यांना दिलेल्या स्वीकृत नगरसेवक पदावरून राज्यभर टीका झाली होती.हे प्रकरण ताजे असतानाच भाजपचे तुषार आपटे यांनी अवघ्या २४ तासांत राजीनामा दिला. त्यानंतर आता भाजपच्या मुस्लिम उमेदवार नियुक्तीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे.

दरम्यान मनसेचे राम जगताप यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना गोरे यांनी हे आरोप फेटाळून लावत, ‘माझ्या आयुष्यात आजवर `एनसी्ही दाखल झाली नसल्याचे म्हटले आहे. तसेच खोटे आरोप करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!