भाजपकडून कारवाईचा धडाका ; माजी महापौरांसह 54 जणांची पक्षातून हकालपट्टी, काय आहे कारण?


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना भाजपकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. भाजपने नाशिकमध्ये मोठी कारवाई करत माजी महापौरांसह तब्बल 54 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत सत्ता आणण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मात्र पक्षशिस्त मोडून अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 20 माजी नगरसेवकांसह एकूण 54 जणांना भाजपने पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे, या यादीत माजी महापौरांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ही कारवाई भाजपच्या नाशिकमधील इतिहासातील सर्वात मोठी हकालपट्टी मानली जात आहे.

दरम्यान नगरसेवक पदाच्या 122 जागांसाठी तब्बल 1,077 इच्छुकांनी मुलाखती दिल्या, मात्र प्रत्यक्षात केवळ 122 उमेदवारी उपलब्ध असल्याने सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. याच टप्प्यावर महायुती होणार की नाही, याबाबतही संभ्रम होता.अखेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने युतीची घोषणा केल्यानंतर भाजपचा स्वबळाचा मार्ग निश्चित झाला. भाजपने 118 उमेदवार जाहीर केले. उमेदवारी न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला.

पक्षाने केलेल्या कारवाईबदल बोलताना भाजप शहराध्यक्षांनी स्पष्ट केले की,पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणे, तसेच अपक्ष किंवा इतर पक्षांकडून उमेदवारी स्वीकारणे ही गंभीर पक्षशिस्तभंगाची बाब आहे. त्यामुळे संबंधितांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!