मध्यरात्री खलबत ; ठाकरेंचा माजी आमदार शिंदेंच्या गळाला, बालेकिल्ल्यातच धक्का बसणार ?


मुंबई : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच आपले आहे. मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असताना शिवसेना ठाकरे गटाला बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसणार आहे.ठाकरे गटाचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची मंगळवारी मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली आहे. ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंच्या माजी आमदारांची मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्यासह निलेश राणे यांनी दगडू सपकाळ यांच्या घरी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. सकपाळ हे ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते मानले जातात. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने पक्षांतर्गत नाराजी आणि संभाव्य हालचालींच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 203 मधून सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ उमेदवारीसाठी इच्छुक होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. आता ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!