सोन्याचा भाव सुस्साट! ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री, एका दिवसात वाढला तब्बल… ,पाहा आजचे नवे दर

पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.

त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे. सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
आजच्या सोन्याचा भाव हा कालच्या भावापेक्षा 800 रुपयांनी वाढला आहे. काल सोन्याचा भाव हा 1600 रुपयांनी वाढले होते. तर काल चांदीचे भाव हे 4 हजार रुपयांची वाढले होते. ते आज पुन्हा 4 हजार रुपयांची वाढले आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचा दर (GST सह) 1 लाख 41 हजार 110 रुपये इतका झाला आहे. काल हाच दर 1 लाख 39 हजार 668 रुपये होता. म्हणजेच एका दिवसात सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या एक ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 14 हजार रुपयांच्या आसपास पोहोचला आहे, जे सामान्य ग्राहकांसाठी चिंतेचे कारण मानले जात आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरांनीही मोठी उसळी घेतली आहे. आज चांदीच्या दरात 4 हजार रुपयांची वाढ झाली असून, कालही चांदी महागली होती. परिणामी चांदीचे दर सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.