आता अजित पवारांच्या सोशल मिडीयावरुन राष्ट्रवादी गायब, भाजप प्रवेश झाला फिक्स??


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार भाजसोबत जाण्याच्या चर्चा सुरु आहेत. पण परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळले असून या फक्त नव्या ‌राजकीय समीकरणांच्या चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी प्रतिक्रीया अजित पवार यांनी दिली आहे.

 

असे असताना आता अजित पवार यांच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाइलवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाचा फोटो होता. तो फोटो आता गायब झाला आहे.

 

विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या सर्व चर्चा फेटाळल्या असतानाही त्यांच्या सोशल मिडीया प्रोफाईलवरुन राष्ट्रवादी गायब झाल्याने अजित पवारांच्या मनात नक्की चाललय काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

 

तसेच मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, माध्यमांनी स्वतःच्या मनाने बातम्या चालवल्या असल्याचंही अजित पवार यांनी म्हटले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!