पुणे- मुंबई मार्गावर 2 दिवस अवजड वाहतुकीला बंदी, कारणही आले समोर


 

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अवजड वाहतुकीला दोन दिवस बंदी घालण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाने माहिती दिली आहे. याबाबत माहिती अशी की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे.

खारघर येथे 16 एप्रिलला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी धर्माधिकारींचे 15 ते 20 लाख समर्थक येणार आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.यामुळे 14 ते 16 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यातून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वाहतूक करणाऱ्या वाहनांना मात्र वगळण्यात आलेलं आहे. यासाठी खारघरमधून सायन पनवेल हायवेवर बाहेर पडता यावं म्हणून कोपरा गावासमोर मोठा रस्ता तयार करण्यात आला आहे.

गेल्या 15 ते 20 वर्षे झाली जो रस्ता बनला नाही तो एका दिवसात तयार करण्याची कमाल पनवेल महानगरपालिकेने केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!