मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा असणार? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं…..


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यां प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते प्रचारात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विविध भागात जाऊन प्रचारसभा घेत आहेत.अशातच आता मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की, मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच महापौर होईल.

आगामी मुंबई महापालिकेतील युतीबाबतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेत आम्ही महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत. मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचाच महापौर होईल. कारण गेल्या निवडणुकीत निवडून आलेले जवळपास 70 नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. 2012 पासूनचे काही लोक आमच्यासोबत आहेत, जवळपास 125 लोक आमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीत विजय होईल आणि महायुतीचा महापौर असेल असं ठामपणे त्यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत असलेल्या नाराज नाट्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मी प्रचार करतोय. देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रचार करत आहेत. आम्ही प्रचारात आघाडीवर आहोत. काही ठिकाणी आमची भाजपाशी युती आहे, काही ठिकाणी अजितदादा यांच्याशी युती आहे. लोकांना स्थानिक पातळीवरील विकास पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीत एकमेकांवर टीका न करता सकारात्मक पद्धतीने, विकासात्मक प्रचार करायचा, असं आम्ही ठरवलेलं आहे, जे काही वाद होते ते आता संपलेले आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!