ठाकरेंच्या शिलेदारासाठी शिंदेसेना मैदानात; भाजप विरोधात राणेंचा एल्गार, वातावरण तापलं..


पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपा यांची महायुती झालेली नाही.या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी असलेले माजी नगराध्यक्ष संदेश पारकर हे कणकवली शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार नीलेश राणे हे ठाकरे गटाच्या नेत्यासाठी मैदानात उतरले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

नगरसेवकांसाठी झालेल्या सभेत शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र आले होते. यावेळी कणकवली शहर विकास आघाडीला नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि नगरसेवकांना निवडून आणू, असा पणच नीलेश राणे यांनी बोलताना व्यक्त केला.तुम्ही काही काळजी करू नका,सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आणि आता मीच मैदानात उतरलोय तर अजून तुम्हाला कोण हवेय, त्यांना पण सगळ्यांना आणू द्या, संदेशजी पारकर तुम्हाला निवडून येण्यासाठी जीवाचे रान करू, पण तुम्हाला शंभर टक्के निवडून आणू असा शब्द निलेश राणे यांनी दिला. ठाकरेंच्या शिलेदारासाठी शिंदे सेना मैदानात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नीलेश राणे पुढे म्हणाले की, महाभारतामध्ये जेव्हा अर्जुनाने विचारले की अरे कृष्णा सगळे आपलेच आहेत समोर, तेव्हा श्रीकृष्णाने उत्तम उत्तर दिलं की ते आपलेच आहेत तर समोर का आहेत, ते आपल्याबरोबर असले पाहिजेत, असं उदाहरण देत नीलेश राणेंनी सांगितलं की पण ते राजकारण वेगळं आहे, त्या राजकारणात आपल्याला पडायचं नाही, आपली चर्चा फक्त विकासात्मक व्हायला पाहिजे, उद्या शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकेल, नगरसेवक करू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!