मुंढव्यातील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणानंतर पार्थ पवारांना वडिलांचा मोठा धक्का ; थेट यादीतून…


पुणे : गेल्या काही दिवसापासून मुंढवा येथील महार वतन जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणीत अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना खुद्द वडिलांनीच स्वतः मोठा धक्का दिला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात वादग्रस्त ठरलेले पार्थ पवार यांना राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक यादीतून वगळण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. जमीन खरेदी व्यवहारात वादग्रस्त ठरलेले पार्थ पवार यांना यातून वगळण्यात आले आहे. तसेच, रुपाली पाटील-ठोंबरे यांनाही या यादीतून डच्चू देण्यात आला आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचेही नाव या यादीत नसून त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव आराम देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

नगरपरिषद आणि पंचायतीसाठी निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून २ डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर जाहीर टीका करणाऱ्या रुपाली पाटील-ठोंबरे यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांचाही समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये पार्थ पवार यांनाही वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल आहे.

दरम्यान या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, धर्मरावबाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, नवाब मलिक, सयाजी शिंदे, मुश्ताक अंतुले, समीर भुजबळ, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, रुपाली चाकणकर, इद्रिस नायकवडी, अनिकेत तटकरे, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, लहू कानडे, कल्याण आखाडे, सुनील मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!