पुण्यातील सरपंच निर्मला नवलें ‘या ‘निवडणुकीला इच्छुक, पक्षश्रेष्ठींना काय केली विनंती?


पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.इंस्टाग्रामवर पाच लाखाहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या नवले या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ही खूप सक्रिय आहेत.आता निर्मला नवले यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे.आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा,” अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.आता पक्षाकडून त्यांना तिकीट दिलं जाणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कारेगावसारख्या मोठ्या गावचं सरपंचपद आणि सोशल मीडियावरील फॅनफॉलोविंगमुळे निर्मला नवले चर्चेत असतात. त्यांच्या विविध मुलाखतीही चर्चेचा विषय ठरत असतात. 27 वर्षाच्या नवले यांनी सरपंच म्हणून राजकीय क्षेत्रात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. महिला सबलीकरण आणि ग्रामीण भागात विकास कमी करण्याकडे त्यांचा जास्त फोकस असतो.निर्मला नवले या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात.राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वी नवले यांना पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी दिली होती. नवले यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी वाढत आहे. तरुण नेते उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षात मोर्चेबांधणी करत आहेत. या पार्श्वभूमीवरच आता निर्मला नवले यांनी नुकतेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत आपली राजकीय महत्त्वाकांक्षा बोलून दाखवली आहे.”मी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा,” अशी विनंती निर्मला नवले यांनी पक्षनेतृत्वाकडे केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!