ब्रेकिंग! शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी ; निकालाकडे राज्याचे लक्ष…


पुणे : जवळपास सव्वातीन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या बंडखोरीनंतर अद्यापही शिवसेना कोणाची? हा प्रश्न अजूनही अनुत्तीरच आहे.शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर झाल्यास राजकीय समीकरणा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होत आहे. ही सुनावणी सलग तीन दिवस चालणार आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर हा युक्तिवाद होणार आहे. ‘या निवडणुकांपूर्वी हा निकाल आला पाहिजे असेच प्रयत्न आहेत,’ असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

दरम्यान शिवसेना पक्ष, चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीसाठी खासदार अनिल देसाई व विधान परिषद सदस्य अनिल परब दाखल झाले आहेत. आजच्या सुनावणीत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!