उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचा लाव रे तो व्हिडीओ, धाराशिवमध्ये तुफान बॅटिंग, सगळंच समोर आणलं…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

त्यांचा दगाबाज रे ही मोहीम सध्या चर्चेत आहे. आज उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यात आहेत. त्यांनी करजखेडा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषनावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाची क्लिप ऐकवली.

निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांचा सातबारा करा. तो त्यांनी उपस्थितांना ऐकवला आणि ‘कोरा कोरा कोरा, मग आता कुठे गेला चोरा चोरा चोरा’,असा टोला त्यांनी लगावला. मतचोरी करुन सत्तेत आलेला आता कुठे गेलात असा सवाल त्यांनी केला आणि जोरदार फटकेबाजी केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी महायुती सरकारवर त्यांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादांची ऑडिओ क्लीप लावून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना काय आश्वासनं दिली होती. याची आठवण त्यांनी शेतकऱ्यांना दिली. तर आता जोपर्यंत कर्जमाफी होत नाही. तोपर्यंत महायुतीला मतदान न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मी तुम्हाला हिम्मत द्यायला आलोय.तुमच्या आशीर्वादाने मी कर्जमाफी केली होती.सगळीकडचे शेतकरी म्हणतात ते मदत मिळाली नाही मग पैसा गेला कुठे ? ऊन पाऊस वाऱ्यात थंडीत शेतकरी मर मर मरतोय, शेतकरी भीक मागत नाहीये. प्रतिकूल परिस्थितीत सोन पिकवायचं आणि एका रात्रीत सर्व माती मोल होत अशी शेतकऱ्यांची व्यथा त्यांनी मांडली. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफी करणार असल्याची ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यावरून निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले, सातबारा करणार कोरा कोरा कुठे गेला रे चोरा…मतचोरा, कर्जमाफी करा हा काय टोमणा आहे का? मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणा मारतात. लाडक्या बहिणींना म्हणायचे मिळाले की नाही? मिळाले की नाही पैसे मिळाले की नाही? मग आता काय झालं, असा सवाल त्यांनी केला. शेतकरी मेला तरी चालेल विकास झाला पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर जगला पाहिजे अशी टीका त्यांनी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!