ठाकरेंना मोठा धक्का ; माजी महापौरासह नगरसेवकांच्या हाती कमळ, भाजपची ताकद वाढणार?

पुणे: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीला लवकरच सुरुवात होणार आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या पक्षाच्या मोर्चे बांधणीला सुरुवात देखील केली आहे. मात्र, भाजपने महानगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आता ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांना गळाला लावल आहे.माजी महापौर आणि 12 माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपची ताकद वाढली असून ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

जळगाव महानगरपालिका सर्वात महत्त्वाची मानली जाणारी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये एकूण 75 नगरसेवक निवडून जात असतात. या महानगरपालिकेमध्ये गेल्या 2013च्या निवडणुकीचा विचार केला तर या महानगरपालिकेमध्ये खानदेश विकास आघाडी म्हणून या ठिकाणी 33 जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळी सुरेश दादा जैन हे घरकुल घोटाळाच्या प्रकरणामध्ये अटकेत होते. त्यांची खानदेश विकास आघाडी हे पॅनल त्यांनी उभं केलं होतं. सुरेश दादा जैन हे अटकेत असल्याची सहानुभूती मिळवत त्यांच्या पॅनलला तब्बल 33 जागा मिळाल्या होत्या.
तसेच 2013च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये तब्बल 13 जागांची बाजी मारली होती. यात ललित कोल्हे यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावर पॅनल निवडून आले होते. या त्यांच्या 13 जागा नगरसेवक पदाच्या निवडून आल्या होत्या. पण बहुमतासाठी 38 जागा लागत असल्यानं सुरेश दादा जैन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेत महानगरपालिके मध्ये सत्ता स्थापन केली होती. दरम्यान आता ठाकरेंचे माजी महापौर आणि 12 माजी नगरसेवकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
