पुण्यात लोकसहभागातून तयार केली पाच हजार किलो मिसळ…!


पुणे : पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी पाच हजार किलोची मिसळ तयार केली आहे. पहाटे तीन वाजल्यापासून मिसळीच्या तयारीला सुरुवात झाली. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्याकडून हे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली.

त्यानंतर महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळवाटप करण्यास सुरुवात झाली. या उपक्रमामध्ये पाच हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी ५०० किलो, कांदा ३०० किलो, आलं १०० किलो, लसूण १०० किलो, तेल ३५० किलो, मिसळ मसाला १३० किलो, लाल मिरची पावडर २५ किलो वापरण्यात आली आहे.

तसेच हळद पावडर २५ किलो, मीठ २० किलो, खोबरे कीस ७० किलो, तमालपत्र पाच किलो, फरसाण १२०० किलो, पाणी चार हजार लिटर, कोथिंबीर ५० जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!