बीडमध्ये वातावरण तापलं : गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार कोण? सारंगी महाजनांची वादात उडी, काय केला दावा..


पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार कोण आहे यावरून सध्या बीडच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. या वादात आता प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. त्यांनी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंडेंचा वारसदार हे धनंजय आणि पंकजा नाही, ते फक्त प्रॉप्रर्टीचे वारसदार आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. यामुळे आता नवीन वादाला ठिणगी पडली आहे.

ऐन दिवाळीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून सारंगी महाजन यांनी आता आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघा भावा आणि बहिणींनी फक्त जमीन हडपण्याचं कामं केलं आहे आणि त्यांनी नातेवाईकांची सुद्धा जमीन सोडली नाही आहे मी त्यांची मामी आहे आणि माझी जमीन सुद्धा यांनी हडपली आहे आणि आम्ही यासंदर्भात आत्ता न्यायालयीन लढाई लढत आहोत. हे दोघे भाऊ आणि बहीण फक्त स्वतःच्या स्वार्थाकरिता एकत्र आले आहेत आणि त्यांनी आपला स्वार्थ साधला की ते वेगळे वेगळे होतील असा खोचक टोला लगावला आहे.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या,.दोन्ही बहीण भाऊ हे फक्त खंडणी वसूल करतात. लोकांना पैशांसाठी मारणे, लोकांच्या जमनी बळकावणे असे त्यांचे उद्योग आहेत. दोन्ही भाऊ बहीण हे नालायक आहेत. हे दोघे कधीच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार होऊ शकत नाही यांनी कुठे कार्यकर्ते उभे केले आहेत आणि यांचे कार्यकर्ते हे तुम्हीच शोधून काढा? बीडच्या जनतेने यांच्याकडे पाठ फिरवली तर हे तोंडावर पडतील असा दावा सारंगी महाजन यांनी केला आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!