पुण्यात धंगेकर अन मोहोळांच्यातील संघर्ष पेटला ; जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरण समोर येणार?


पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुण्यात शिवसेना महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर धंगेकर यांनी आता पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर नवा बॉम्ब टाकत ‘जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली 2 प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात’ असं म्हटल आहे. त्यामुळे आता हा संघर्ष आणखी वाढणार आहे.

दरम्यान, काल मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका करताना ‘मला त्या माणसाबद्दल आता परत बोलायचं नाही. त्याचे अनेक प्रकरण बाहेर येत आहेत, असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे ते म्हणाले,मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटल की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे.बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात. असं देखील रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील हा संघर्ष आणखीनच टोकाला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान आता मोहोळ यांनी माझ्यावर एकही गुन्हा नाही असं म्हटल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची पत्र समोर आणत मोहळांच्या गुन्ह्यांची यादीच समोर आणली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात त्यांच्या संघर्षाने खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!