पुण्यात कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळ? गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांचा अल्टीमेटम…!

पुणे : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल कंपनीने कोणताही अनुभव नसताना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवले. असा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

ते म्हणाले, पुणे पोलिसांनी पुढील सात दिवसात पाटकर यांच्या कंपनीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेकडून शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हे जम्बो कोवीड सेंटर उभारण्यात आले होते. हे कोविड सेंटर चालविण्यासाठीचे कंत्राट सुजित पाटकर यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीला देण्यात आलं होतं.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पीएमआरडीएकाडून हे कंत्राट देण्यात आले. कंपनीचा अनुभव किती व तीन वर्षाचे ताळेबंद अशी माहिती मागविण्यात आली होती. पंरतु, ही माहिती देण्यात आली नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.