मुंबईतील व्यावसायिकाला डिजिटल अरेस्टची धमकी ; ५८ कोटी रुपयांना फसवलं….


मुंबई : मुंबईतील व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी तब्बल 58 कोटी रुपयाला गंडा लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूक झाल्याचे समजताच जोडप्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. धक्कदायक म्हणजे या जोडप्याकडून सायबर ठग्यांनी ५८.१३ कोटी रुपये उकळले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सायबर ठग्यांनी व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलद्वारे जोडप्याशी संपर्क साधला . त्यांनी स्वतःची ओळख सुब्रह्मण्यम आणि करण शर्मा अशी करून बनावट सरकारी ओळखपत्रे आणि कागदपत्रे सादर केली आणि केंद्रीय एजन्सींचे अधिकारी असल्याचा दावा केला.त्यानंतर ईडी आणि सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत या दोघांनी या जोडप्याला त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याचं बनावट कारण दिल. शिवाय तपासात सहकार्य केले नसल्यास अटक करण्यात येईल असेही सांगण्यात आलं. दरम्यान दबाव आणि भीतीमुळे, या जोडप्याने दोन महिन्यांत १८ वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ५८. १३ दशलक्ष रुपये ट्रान्सफर केले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.

आतापर्यंत, या खळबळजनक प्रकरणात अब्दुल खुल्ली (४७), अर्जुन कडवसरा (५५) आणि जेताराम कडवसरा (३५) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या टोळीने आतापर्यंत कोणत्या कोणत्या लोकांना लुबाडलं आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!