बायको बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये; ऐकताच पती खवळला, रागाच्या भरात धुलाई, अन् नंतर…

उत्तर प्रदेश : आपल्या पत्नीला दुसऱ्या तरुणासोबत हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने आपले भान हरपून निर्दोष व्यक्तीवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे.
झाशीच्या मौरानीपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या मुकेश आर्य या तरुणाला कुटुंबातील सदस्यांकडून माहिती मिळाली की, त्यांची पत्नी एका तरुणासोबत हॉटेलमध्ये आहे. हे ऐकताच तो संतापाने पेटून उठला आणि थेट हॉटेलवर धाव घेतली.
तेथे त्याने पत्नीला तिच्या शेजारी सोनू उर्फ प्रमोद आर्य नावाच्या तरुणासोबत पाहिले. हे दृश्य पाहताच त्याचा ताबा सुटला आणि त्याने कोणताही विचार न करता सोनूला खेचून नेले. त्यानंतर त्याच्या दुकानात घेऊन लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
या घटनेदरम्यान सोनू गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्या बचावासाठी आलेल्या वडिलांनाही आणि भावालाही आरोपीने सोडले नाही. या तिघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर मौरानीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एका स्थानिकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.
दरम्यान, मारहाण झालेल्या सोनूने पोलिसांकडे तक्रार देताना सांगितले की, तो काही कामानिमित्त हॉटेलमध्ये गेला होता. त्याच वेळी एका महिलेने हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी मदत मागितली होती. त्याने फक्त तिला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हाच तिचा नवरा मुकेश हॉटेलमध्ये आला आणि गैरसमजातून त्यालाच पत्नीचा प्रियकर समजले. त्या महिलेचा खरा प्रियकर तेव्हाच पळून गेला होता. परिणामी निर्दोष सोनूला जबर मारहाण सहन करावी लागली.
यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुकेश आर्यला ताब्यात घेतले. चौकशीत महिलेनेही स्पष्ट सांगितले की, सोनू तिचा प्रियकर नसून शेजारी आहे आणि त्याच्याशी तिचा कोणताही संबंध नाही. ती दुसऱ्याच व्यक्तीला भेटण्यासाठी आली होती, पण चुकीच्या वेळी सोनू तेथे उपस्थित असल्याने त्याला सर्वांचा राग ओढवला.
या घटनेनंतर मौरानीपूर पोलिसांनी आरोपी मुकेश आर्यविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. संतापाच्या भरात केलेली ही चूक आता त्या पतीला चांगलीच महागात पडली असून, निर्दोष सोनूला मात्र अन्यायकारक शिक्षा भोगावी लागली आहे.