महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला ; विविध प्रश्नांची सरबती,5 व्या मुद्द्याचं आयोगासमोर मोठं आव्हान?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राज्यातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पारदर्शकतेची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीच आयोगासमोर मोठं आव्हान असणार आहे.यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मतदार यादीतील त्रुटी, VVPAT चा वापर न करणे, दुबार नोंदणी यांसारख्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त करत त्यांनी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.. तसेच इलेक्शन यादी का बघायला मिळत नाही? निवडणुकीचा फार्स कशाला? असे अनेक प्रश्न विरोधी पक्षांनी केले आहेत.
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाची ही भेट झाली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्ष, पारदर्शक आणि संविधानिक पद्धतीने व्हाव्यात, या मागणीसाठी शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांना एक निवेदनही देण्यात आलं.
दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसे अध्यक्ष यांनी काही प्रश्नही उपस्थित केले. निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ? असा सवाल राज ठाकरेंनी केला. वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, अनेक ठिकाणी असं घडल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.